"ग.स. सोसायटीचे ध्येय आहे की, केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे. त्यात यथाशक्ती योगदान द्यायचं. इतरांनाही या कार्यामध्ये सामावून घ्यायचं. ग्रामीण आणि शहरी भागात, जिथे जिथे काही नवीन काही बदल घडवता येतील तिथे तिथे विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये सळसळता उत्साह आणि अशा जागृत करायच्या. गेल्या अनेक वर्षांपासून ग.स. सोसायटी विविध क्षेत्रांमध्ये भरीव काम करत आहे. याचा आनंद यासाठी आहे की, लोकसहभाग लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. लोकांना या कार्यांत जोडले जायला मनातून इच्छा होत आहे. यातून मानवतेची एक मजबूत साखळी तयार होत आहे, जी बुलंद भारत निर्मितीसाठी सक्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, बाबा आमटे, एपीजी अब्दुल कलाम, रतनजी टाटा, बी.बी. आबा अशा अनेकानेक महान व्यक्तीच्या विचारांचा आणि कार्याचा आमच्यावर प्रभाव आहे. सामाजिक बांधिलकी जपताना आम्हाला समाजातूनच प्रेरणा मिळते. विश्वास मिळतो.
सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा, चांगली जीवनशैली विकसित व्हावी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक इ. सर्वांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी ग.स. सोसायटी सातत्याने प्रयत्नशील होती, आहे आणि कायम राहील. या चळवळीमध्ये आपले स्वागत आहे.
ग.स. सोसायटी हे आमचे नव्हे तर आपला परिवार आहे. आम्ही केवळ पहिले पाऊल उचलले आणि समाजातील तमाम लोकांनी आम्हाला साथ दिली. आमच्या पावलांना बळ दिले. पुढे-पुढे जाण्यासाठी हिम्मत दिली.
ग.स. सोसायटी स्थापना सन 1909 मध्ये जळगाव जिल्ह्यतील येतील जळगाव येथे झाली. तिथे पेरलेली समाजभावना, मुळं घट्ट करत सर्वदूर पोहोचू लागली. आता जळगावमध्ये संस्थेचे मुख्य कार्यालय आहे आणि कार्य जिल्हाभर.
क्षेत्र कुठलेही असो – आरोग्य, कृषी, अर्थ, कला, क्रीडा, शिक्षण, महिला विकास, विद्यार्थी विकास, समाज प्रबोधन, मानवकल्याण, ग्रामविकास, इ. अनेक क्षेत्रात आजवर व्यंकटेश फाउंडेशनने अखंडपणे आणि भरीव काम केले आहे आणि यापुढेही सुरूच राहील.
संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देऊन त्यांच्या स्वप्नांच्या पंखात बळ दिले.
संस्थेला सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे. भांडवल उभारणी व गुंतवणूक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारून भांडवल उभारते.
मुंबई इलाख्यात त्यावेळी पगारदार नोकरांच्या चार संस्था स्थापन झाल्या होत्या. त्यापेकी एक, पपण खांदेशातील पहिलीच सरकारी नोकरांच्या नागरी सहकारी संसस्थेची मुहूर्त मेढ रोवली गेली.
संस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगांव जिल्हा असून संस्थेच्या जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व सभासदांना जामीन कर्ज, मोपेड कर्ज, विशेष कर्ज वाटप करणे ह्या सुविधा पुरविणे.