Homeगुणवंत पाल्यांसाठी पारितोषिक योजना

 

 

 

 

येथील जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचार सहकारी पतपेढी तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या पाल्यांचा सत्कार या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला आहे.

मार्च २०१२ या र्शक्षणिक वर्षामध्ये ज्या सभासदांचा पाल्यास इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ८०% टक्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तसेच पदवी (बी.ए./बी.कॉम.बी.एस.सी.) मध्ये ६५% पेक्षा जास्त गुण, दपव्युत्तर (एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी.) मध्ये ६५% पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तसेच शासनमान्य डिग्री, डिप्लोमा या परिक्षेत उत्तीर्ण झालेले असतील तसेच राज्यस्तरीय खेळाडू अशा सभासदांनी अर्जासह गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत पतपेढीमध्ये दि. ४ ऑगस्ट पर्यंत सादर करावी. प्राप्त झालेल्या अर्जामधून गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक संचालक मंडळाच्या बैठकीत निवडण्यात येतील व अशा अभिनंदकास पात्र पाल्यांचा सत्कार वार्षिक साधारण सभेत करण्यात येणार आहे.