GS


कर्मचारी कल्याण योजना


कर्मचारी – कल्याण योजना

१) कर्मचार्यांच्या पगारातून संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दरमहा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते.

२) कर्मचार्यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते.

३) कर्मचारी कल्याण निधी योजना असून त्यात हुद्द्यानुसार रू. २० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्यांकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा करते. त्याद्वारे कर्मचारी यांच्या आजारपणासाठी व त्यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणांसाठी रू. ४०,०००/- एवढे कर्ज दिले जाते त्याच्या व्याजदर ६ % आहे तसेच या निधीतून सेवानिवृत्ती नंतर रू. ४०,०००/- व मयत झाल्यावर रू. ४०,०००/- एवढी मदत दिली जाते.

४) कर्मचार्यांचे पगार महाराष्ट्र शासनाच्या कर्मचार्याप्रमाणे आहेत वेळोवेळी महागाई दरात होणारे बदल तात्काळ दिले जातात.

५) कर्मचार्यांना दरमहा १,००० रू. मेडिकल अलाऊंस दिला जातो.

६) कर्मचार्यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत सामापून घेतले जाते.

७) शिपायांना दर दोन वर्षाने २ ड्रेस व छत्री दिली जाते.

८) शिपायांना रू.५० धुलाई भत्ता दिला जातो.

९) कर्मचार्यांना गृप इन्शुरन्स योजना लागू आहे.



कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित
२८४, बळीराम पेठ, जळगांव - ४२५००१, महाराष्ट्र, भारत    

दुरध्वनी संपर्क 

फोन क्र. : ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.
फॅक्स : ०२५७ - २२३३५४०
ई-मेल -jdgss1909@gmail.com