संस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगाव जिल्हा असून संस्थेच्या जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व सभासदांना जामीन कर्ज, मोपेड कर्ज, विशेष कर्ज वाटप करणे ह्या सुविधा पुरविणे. ही संस्थेची सर्वसाधारण कार्य पध्दती आहे. त्यासाठी जिल्ह्याभरात ५५ शाखा सदैव तत्पर सेवा देत असतात.
१) कार्यालय अधीक्षक प्रशासन अधिकारी हे कर्मचाऱ्यां संबधी व संस्थेच्या प्रशासना संबंधीचे सर्व कामकाज पाहतात.
२) लेखापाल : संस्थेचे सर्व आर्थिक व हिशोबी कामकाज पाहतात.
३) कर्ज अधीक्षक : कर्ज, हायपॉथीकेशन कर्ज, वाटप व वसुली व थकबाकीचे कामकाज पाहतात.
४) विशेष वसुली अधिकारी : वसुली अधिकारी हे त्यांच्या विभाकडील थकबाकी वसुलीचे काम सांभाळतात.
५) विभा. अधिकारी : हे त्यांना नमूद दिलेल्या विभागातील संपूर्ण कामकाजाची १००% तपासणी करतात. थकबाकी वसुली करणे व त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे इ. कामकाज करतात.
६) शाखाधिकारी : हे त्यांच्या हाता खालील उपशाखाधिकारी लेखनिक शिपाई यांच्या मदतीने त्या त्या तालुक्यात कर्ज वाटप करणे, वसुलीकरणे, ठेवी गोळा करणे, तसेच मुख्य कार्यालयास त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा सादर करणे, इ. कामकाज करतात.