GS


संस्थेची यशस्वी शतपूर्ती


संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना  सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देऊन त्यांच्या 

स्वप्नांच्या पंखात बळ दिले. वयस्क आधारवड होऊन क्षणभर विसावण्यासाठी  सभासदांच्या कुटुंबात आनंद होऊन तटस्थ, समर्थवान, अभिमानाने ताठ उभी राहीली. 

संस्था जरी शंभरीला पोहचली तरी तारूण्यांचा सळसळणारा प्रवाह अजुनही उरात बाळगुन मदतीचा हात देऊन  बळकटी कायम ठेवली आहे. नवचैतन्याच्या स्पर्शाची उब दिली आहे. 

आकाश निळे आहे, कारण ते खुप खुप खोल आहे. खुप गहीरं आहे, अनंत आहे. समुद्राच पाणी नीळं आहे, ते ही खुप गहीरं आहे,

कृष्ण निळा आहे कारण तो ही खुप खोल असा तत्त्वज्ञानी योगी आहे.  ध्यानमग्नतेची शंभर वर्षाची परंपरा पाहता शरीरातील सप्तरंग छेडत छेडत निघालागतं, आणि शेवटी विश्वचैतन्याशी गाठ पडतेच  तर  त्याचा ही मूळ रंग सुद्धा निळाच आहे. त्याचं अनंतरुपसुद्धा नीळचं आहे. खरतर हे तेज आणि मूळ ब्रह्माच मुळ ज्ञान तेज ही अशीच एक आहेत. ही अद्वैताची स्थिती आहे. ही स्थिती तशी उच्च कोटीची  आनंदमय अशी स्थिती आहे आणि हा आनंद वर्णणातीत असाच असतो. म्हणून निळा रंग निवडला आहे. 


कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित
२८४, बळीराम पेठ, जळगांव - ४२५००१, महाराष्ट्र, भारत    

दुरध्वनी संपर्क 

फोन क्र. : ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.
फॅक्स : ०२५७ - २२३३५४०
ई-मेल -jdgss1909@gmail.com