संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देऊन त्यांच्या स्वप्नांच्या पंखात बळ दिले.
संस्थेला सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे. भांडवल उभारणी व गुंतवणूक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारून भांडवल उभारते.
मुंबई इलाख्यात त्यावेळी पगारदार नोकरांच्या चार संस्था स्थापन झाल्या होत्या. त्यापेकी एक, पपण खांदेशातील पहिलीच सरकारी नोकरांच्या नागरी सहकारी संसस्थेची मुहूर्त मेढ रोवली गेली.
संस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगांव जिल्हा असून संस्थेच्या जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व सभासदांना जामीन कर्ज, मोपेड कर्ज, विशेष कर्ज वाटप करणे ह्या सुविधा पुरविणे.