GS

सरळसेवा भारती 2025 विषयी माहितीसाठी येथे क्लिक करा.

अर्ज भरतांना काही अडचणी आल्यास gssocietyjalgaon@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी ही महाराष्ट्रात आर्थिक क्षेत्रात एक नावाजलेली संस्था म्हणून सर्वपरिचित आहे. सभासदांच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्यदेऊन शतकापेक्षाहीं अधिक काळापासून या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे. सभासदाच्या अडचणीच्या काळात त्याला सदैव मदतीचा हात संस्थेने दिला, आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पारपाडलेली आहे, सभासदाला आर्थिक -दृष्ट्या सक्षम करण्यास हात भार लावलेला आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही.

उद्दिष्ट्ये
१) सभासद, कर्मचारी आणि त्यांचा पाल्यांच्या राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षा होण्यासाठी सक्षम बनविण्यास मदत करणे .
२) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्यामधे स्पर्धा परीक्षांला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.
३) नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वस्तरावरील स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
४) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना अद्यावत ग्रंथालय सुविधा आणि इंटरनेट सुविधा पुरविणे.
५) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक संदर्भसाहित्य ग्रंथालयद्वारे उपलब्ध करून देणे.
६) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षासाठी प्रोत्साहन, प्रेरणा मिळावीयासाठी तज्ञ अनुभवी व्यक्तीच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करणे.
७) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेशित उमेदवारांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देणे. 

आजच्या २१व्या शतकात डिजिटल क्रांतीच्या ताकदीने ग.स. सोसायटीच्या कार्यप्रणालीतदेखील आमूलाग्र बदल झाले आहेत. सभासदांना दिली जाणारी सुविधा दिवसेंदिवस सोपी कशी होत जाईल यावर सोसायटीचा भर आहे. आशिया खंडातील सर्वोत्तम असलेली हि संस्था जास्तीत जास्त समाजोपयोगी राहण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. सोसायटीतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांद्वारे सभासदांचे हितच जोपासले जात आहे. सर्वसमावेशक पद्धतीने निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अश्या कार्यपद्धतीने संस्थेशी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती अभिमानाची भावना बाळगून आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, बाबा आमटे, एपीजी अब्दुल कलाम, रतनजी टाटा, बी.बी. आबा अश्या व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शांना डोळ्यासमोर ठेऊन सोसायटीच्या यशाचा हा प्रवास असाच निरंतर सुरु राहील यात शंका नाही. ग.स. सोसायटी तसेच सहकारक्षेत्रात सेवा देण्याची संधी माझ्याकडे आहे याचा मनस्वी आनंद आहे.

अध्यक्ष
रागिणी किशोरराव चव्हाण

ग.स.सोसायटी,जळगाव. ही केवळ आर्थिक गोष्टींसाठी चालणारी सोसायटी नसून सामाजिक बांधिलकी जपणारी ११८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा आहे. या परंपरेची सांगड आता सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीसोबत जोडल्या गेली आहे. याचा फायदा आता सर्व सभासदवर्गासाठी होत असून संस्थेच्या कार्यावेगात वाढ झाली आहे. पुढे पडत जाणारे एक एक छोटे पाऊल मैलाचा दगड पार करते... अगदी याच पद्धतीने सोसायटी यशाची शिखरे सर करत जाईल यात शंका नाही. सभासदांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविणे हीच नैतिक जबाबदारी संस्था आणि संचालक मंडळाची असून त्याचाच मीदेखील एक भाग आहे हे मी माझे भाग्य समजतो. 

उपाध्यक्ष
अनिल कौतिक गायकवाड पाटील
Mobirise

संस्थेची यशस्वी शतपुर्ती

संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देऊन त्यांच्या स्वप्नांच्या पंखात बळ दिले.

Mobirise

संस्थेची आर्थिक वाटचाल

संस्थेला सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे. भांडवल उभारणी व गुंतवणूक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारून भांडवल उभारते.

Mobirise

संस्थेचा इतिहास

मुंबई इलाख्यात त्यावेळी पगारदार नोकरांच्या चार संस्था स्थापन झाल्या होत्या. त्यापेकी एक, पपण खांदेशातील पहिलीच सरकारी नोकरांच्या नागरी सहकारी संसस्थेची मुहूर्त मेढ रोवली गेली.

Mobirise

शाखा व्यवस्थापन

संस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगांव जिल्हा असून संस्थेच्या जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व सभासदांना जामीन कर्ज, मोपेड कर्ज, विशेष कर्ज वाटप करणे ह्या सुविधा पुरविणे.

कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित
२८४, बळीराम पेठ, जळगांव - ४२५००१, महाराष्ट्र, भारत    

दुरध्वनी संपर्क 

फोन क्र. : ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.
फॅक्स : ०२५७ - २२३३५४०
ई-मेल -gssocietyjalgaon@gmail.com