कर्मचारी-कल्याण योजना

१) संस्था कर्मचार्‍यांना दरवर्षी पोटनियम नं ४८ चा ३ नुसार ८.३३ % एवढा बोनस देते.

२) कर्मचार्‍यांच्या पगारातुन संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दर महा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते.

३) कर्मचार्‍यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते.

 ४) कर्मचारी कल्याण निधी योजना असुन त्यात हुद्द्यानुसार रू.२० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्‍याकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा करते. त्याद्वारे कर्मचारी यांच्या आजारपणासाठी व त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणांसाठी रू. ४०,०००/ एवढे कर्ज दिले जाते त्याच्या व्याजदर ६ % आहे तसेच या निधीतुन सेवानिवृत्ती नंतर रू. १५,०००/ व मयत झाल्यावर रू. १५,०००/ एवढी मदत दिली जाते.

५) संस्थेच्या पोटनियम नं ६८ नुसार कर्मचार्‍यांना खालीलप्रमाणे ७.५ % दराने घर बांधणीसाठी कर्ज दिले जाते.

i) व्यवस्थापक - ३,५०,०००/ 

ii) विभा. अधिकारी - ३,२५,०००/

iii) शाखाधिकारी उपशाखाधिकारी - ३,००,०००/

iv) लिपीक(लेखनिक) - २,७५,०००/

v) शिपाई - २,२५,०००/

६) कर्मचार्‍यांचे पगार महाराष्ट्र शासनाच्या कर्मचार्‍याप्रमाणे आहेत वेळोवेळी महागाई दरात होणारे बदल तात्काळ दिले जातात. 

७) कर्मचार्‍यांना दरमहा २०० रू. मेडीकल अलाऊंस दिला जातो.

८) कर्मचार्‍यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत सामापुन घेतले जाते.

९) शिपायांना दर दोन वर्षाने २ डे्रस व छत्री दिली जाते.

१०) रोखपाल दरमहा १०० रू. वॅâश अलॉस व शिपायांना रू.५० धुलाई भत्ता दिला जातो.

११) कर्मचार्‍यांना गृप इन्शुरन्स योजना लागु आहे.

 

श्रेणी:योजना.
हिट्स:5088.

.