दिनांक २३/६/२०१९ रोजि झालेल्या सत्कार सोहळ्य़ातिल सत्कारार्थि.

द्वारा लिखित.
श्रेणी:योजना.
हिट्स:1022.

कर्मचारी-कल्याण योजना

१) संस्था कर्मचार्‍यांना दरवर्षी पोटनियम नं ४८ चा ३ नुसार ८.३३ % एवढा बोनस देते.

२) कर्मचार्‍यांच्या पगारातुन संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दर महा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते.

३) कर्मचार्‍यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते.

 ४) कर्मचारी कल्याण निधी योजना असुन त्यात हुद्द्यानुसार रू.२० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्‍याकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा करते. त्याद्वारे कर्मचारी यांच्या आजारपणासाठी व त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणांसाठी रू. ४०,०००/ एवढे कर्ज दिले जाते त्याच्या व्याजदर ६ % आहे तसेच या निधीतुन सेवानिवृत्ती नंतर रू. १५,०००/ व मयत झाल्यावर रू. १५,०००/ एवढी मदत दिली जाते.

५) संस्थेच्या पोटनियम नं ६८ नुसार कर्मचार्‍यांना खालीलप्रमाणे ७.५ % दराने घर बांधणीसाठी कर्ज दिले जाते.

i) व्यवस्थापक - ३,५०,०००/ 

ii) विभा. अधिकारी - ३,२५,०००/

iii) शाखाधिकारी उपशाखाधिकारी - ३,००,०००/

iv) लिपीक(लेखनिक) - २,७५,०००/

v) शिपाई - २,२५,०००/

६) कर्मचार्‍यांचे पगार महाराष्ट्र शासनाच्या कर्मचार्‍याप्रमाणे आहेत वेळोवेळी महागाई दरात होणारे बदल तात्काळ दिले जातात. 

७) कर्मचार्‍यांना दरमहा २०० रू. मेडीकल अलाऊंस दिला जातो.

८) कर्मचार्‍यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत सामापुन घेतले जाते.

९) शिपायांना दर दोन वर्षाने २ डे्रस व छत्री दिली जाते.

१०) रोखपाल दरमहा १०० रू. वॅâश अलॉस व शिपायांना रू.५० धुलाई भत्ता दिला जातो.

११) कर्मचार्‍यांना गृप इन्शुरन्स योजना लागु आहे.

 

श्रेणी:योजना.
हिट्स:4684.

सभासदांसाठीच्या योजना

१) जामिन कर्ज: सभासदांना २ जामिनावर जमा वर्गणी अधिक रू. १,४०,०००/ एवढे कर्ज तात्काळ दिले जाते; त्याचा व्याजाचा दर ११ % असतो.

२) वर्गणीचे आतील कर्ज : सभासदांच्या जमा वर्गणी एवढे तात्काळ दिले जाते.व्याजदर८ %.

३) विशेष कर्ज : सभासदांना २ जमिनावर रू. २,८०,०००/ पर्यंत कर्ज दिले जाते. त्याचा व्याजदर १३ % असतो.

४) मोपेड कर्ज : सभासदांना दुजाकी पाहन खरेदीसाठी १३ % दराने पत पुरवठा केला जातो. वरील पतपुरवठा करतांना सभासदांची कर्ज फेडीची क्षमता पाहीले वरच कर्ज पुरवठा करण्यात येतो.

५) जनता अपघात विमा योजनेव्दारे एक लाखापर्यंत संरक्षण दिलेले आहे. आज पावेतो १५० सदस्यांना १५० लाखांची मदत.

६) सभासद मयत झाल्यास त्यांचे वारंसांना रू. २५,०००/ राखीने मदत तसेच जमा वर्गणी अधिक शेअर्स वजा जाता राहीलेले जामिन कर्ज संपुर्ण माफ. तसेच सभासदांकडे जामिन कर्ज नसल्यास रू. १०,०००/ ची मदत दिली जाते.

७) सभासद मयत झाल्यास रु ६०,००० /- पावेतो विशेष कर्ज माफ केले जाते. विशेष कर्ज बाकी नसल्यास रु २५००/- चे आर्थीक सहाय्य दिले जाते.

८) सभासदांना अपघात घडल्यास जनता अपघात योजनेद्वारे १ लाखा पर्यंत मदत.

 

श्रेणी:योजना.
हिट्स:8311.

.