पृथ्वीलाही सुचक स्वप्ने पडावीत त्या प्रमाणे काही सदगृहस्थांना सहकाराची भव्य स्वप्ने पडलीत. सन १९०६ मध्ये सरकारी कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे त्या वेळच्या खान्देश विभागाची कामकाजची सुसंगती निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने पुर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे खान्देशचे दोन भाग केले. धुळे येथील मुख्य वेंâद्राची विभागणी होऊन पुर्व खान्देश जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे करण्यात आले.

शासनातील कार्यालयीन कामकाजाच्या विभागणी बरोबर नोकर वर्गाची देखील विभागणी होऊन बराचसा नोकर वर्ग धुळ्यावरून जळगाव येथे बदली होऊन आला. या बदली होऊन आलेल्या नोकर वर्गाच्या दृष्टीने जळगाव हे त्यांना नविनच होते. त्यामुळे या भागात ना कोणाशी ओळख ना परिचय सर्वच अनोळखी असल्यामुळे घर भाड्याने मिळविणे, आर्थीक आडचणींच्या प्रसंगी मदत न मिळणे, दुकाणदारांकडून उधारीने माल मिळविणे इ. दैनंदिन संसार चालवितांना नानाविधी समस्यांचा या बदलून आलेल्या नोकर वर्गा समोर मोठाच प्रश्न उभा राहीला.

आपल्या दैनंदिन आडचणी निवारण्याचा प्रयत्न नोकरवर्गाने सुरु केला. त्यावेळेस नुकताच सन १९०४ मध्ये हिंंदुस्थानच्या सहकारी पतपेढीचा कायदा पारीत झालेला होता. त्यावेळी सरकारने केलेल्या कुठल्याही सुधारणा अगर कायदे हे प्रामुख्याने सरकारी अधिकार्‍यांमार्पâत अंमलात आणले जात होते. त्यामुळे सर्व साधारण जनतेपेक्षा या सुधारणांची अथवा कायद्यांची खरी जाणीव व माहीती सरकारी नोकरांनाच विशेषतत्वाने होती. त्यामुळे जळगाव येथील सरकारी नोकरांचे आपल्या वैयक्तीक आडचणी सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, त्याप्रसंगा मधुनच सन १९०४ च्या सहकारी कायद्यान्वये पगारदार नोकरांची सहकारी पतपेढी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती म्हणून १५ डिसेंबर १९०९ रोजी पुर्व खान्देश सरकारी नोकरांची म्युचुअल हेल्प आणि प्रॉव्हीडंड फंड को-ऑप सोसायटी जळगावची स्थापना करण्यात आली.

श्रेणी:G.S.Society.
हिट्स:12622.

.