संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना
सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देवून त्यांच्या
स्वप्नांच्या पंखात बळ दिले. वयस्क आधारवड होऊन क्षणभर विसावण्यासाठी
सभासदांच्या कुटुंबात आनंद होवून उन्हात तटस्थ, समर्थवान, अभिमानाने ताठ उभी राहीली.
संस्था जरी शंभरीला पोहचली तरी तारूण्यांचा सळसळणारा प्रवाह अजुनही उरात बाळगुन मदतीचा हात देवून
बळकटी कायम ठेवली आहे. नव चैतन्याच्या स्पर्शाची उब दिली आहे.
आकाश निळे आहे, कारण ते खुप खुप खोल आहे. खुप गहीरं आहे, अनंत आहे. समुद्राच पाणी निळ आहे,तेही खुप गहीरं आहे,

कृष्ण निळा आहे कारण तोही खुप खोल असा तत्वज्ञानी योगी आहे.
ध्यान मग्नतेची शंभर वर्षाची परंपरा पाहता शरीरातील सप्तरंग छेडत छेडत निघाव लागतं, आणि शेवटी विश्वचैतन्याशी गाठ पडतेच तर

त्याचाही मुळ रंग सुद्धा निळाच आहे. त्याचं अनंत रुप सुद्धा निळचं आहे.
खर तर हे तेज आणि मुळ ब्रम्हाच मुळ ज्ञानतेज ही अशीच एक आहेत. ही अद्वैताची स्थिती आहे. ही स्थिती तशी उच्चकोटीची

आनंदमय अशी स्थिती आहे, आणि हा आनंद वर्णणातीत असाच असतो. म्हणून निळा रंग निवडला आहे.

 

 

 

.